3 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावून पळवुन नेले आहे. याबाबत दि. 4 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजून 41 मिनिटांनी मुलीच्या वडिलांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुढील तपास पोलीस करीत आहे