21 ऑगस्टला रात्री 7 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास पोलीस स्टेशन नंदनवन येथे आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्व धर्मीय सदस्य उपस्थित होते. दरम्यान येणारे सण शांततेत साजरी करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी केली आहे. यादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी नागरिकांना सुरक्षा विषयी देखील माहिती दिली.