लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने बोरगाव ग्रामपंचायतीने जपला शिक्षणाचा वसा, मराठी शाळा वाचवण्यासाठी घेतली जबाबदारी. शासन केवळ घोषणांच्या ढगात हरवल्यामुळे आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामाच्या महापुरामध्ये ढकलन्याने सरकारचे शिक्षण धोरण कोलमडू लागल्याचे दिसत आहे.पटसंख्येचा बागलबुवा दाखवून मराठी शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा 14000 शाळा बंद करण्याचे जाहीर केले आहे.जिल्ह्यासहं राज्यात बऱ्याच ठिकाणी चार इयत्ता द