देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की आपला देश बंदर क्षेत्रात आघाडीवर असावा. हे साध्य करण्यासाठी, सरकार देशभरात हरित तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि भारताला जागतिक स्तरावर विकसित राष्ट्रांच्या मार्गावर आणण्यासाठी काम करत आहे. आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी एक्वा स्टेंटर ई-टग बोटची उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरात वैयक्तिकरित्या तपासणी करण्यात आली.