पारोळा तालुक्यातील शेळावे गावातील सरपंच पती आणि ग्राम रोजगार सेवक याने गावातील गोरगरीब, निराधार, अपंग, विधवा आणि अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना रोजगार हमी आणि घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने प्रत्येकी १० ते १५ हजार रुपये रोख घेवून फसवणूक केली आहे. तक्रार देवूनही पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गावातील महिलांनी शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.