पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर 2025) रात्री साडेसातच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील सुतार वस्तीजवळ ही धक्कादायक घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गाडगे हे कळसहून रानमळ्याच्या रस्त्याने घरी परतत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता हा प्रकार उघडकीस आला.