30 ऑगस्ट ला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार आगामी सण उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सीताबर्डी हद्दीतून पोलिसांनी भव्य रूट मार्च काढला. हा रूट मार्च एसीपी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता या रूट मार्चमध्ये 100 अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. हा रूट मार्च सीताबर्डी हद्दीतील बर्डी मुख्य मार्केट मोबाईल मार्केट आणि गणपती मंडळांना भेट देत समोर सरकला. या रूटमार्च च्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले