चिखली शहरातील गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विविध देखावे सादर करून जनजागृती केली. चालू घडामोडी, पुरातन काळातील वस्तू, अशा अनेक प्रकारच्या देखाव्यांचा यात समावेश होता. विविध वाद्यांचा गजर आणि युवकांच्या जल्लोषाने चिखली शहर दुमदुमले होते. आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.या वेळी जिल्हाधिकारी श्री. किरण पाटील,यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.