नालासोपारा अहमदनगर परिसरात असलेली इमारत धोकादायक स्थितीत असलेली अल्फिया इमारत खचली. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. या धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतीवर वसई- विरार शहर महानगरपालिका मार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. क्रेन पोकलेनच्या सहाय्याने धोकादायक स्थितीत असलेली इमारत पाडण्यास महानगरपालिकेमार्फत सुरुवात करण्यात आली आहे. इमारत परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.