पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. डहाणूहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अचानक बिघाड झाला आहे. रेल्वे ट्रेन सुरू होत असताना व्हायब्रेट होत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ही लोकल पालघर रेल्वे स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली. यामुळे लोकल सेवा व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले आहे.