बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख येथे २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मारोती संस्थान येथील सांप्रदायिक वारकरी मंडळींच्या वतीने संत गजानन महाराज संजीवनी समाधी दिनानिमित्त भव्य शोभायात्रीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी भजनी मंडळाच्या वतीने शेलगाव देशमुख येथील गावातून पालखी सोहळा काढण्यात आला.यावेळी ह.भ.प केशव ताकतोडे,रामेश्वर आखरे, तातेराव गरड, प्रकाश शिंदे, प्रकाश आखरे, बंडू ताकतोडे आदी उपस्थित होते.