नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मोहिदा शिवारात शेतकरी आनंदा चौधरी यांनी लाखो रुपये खर्च करून तीन एकरात मिरची पिकाची लागवड केली होती. ऐन काढणीला आलेले मिरची पिक झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानी गेले आहे. नुकसान भरपाई मिळावी पीक विम्यात मिरची पिकाचा समावेश व्हावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.