आज दिनांक आठ स्पटेंबर रोजी दुपारी चार वाजता पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय खो-खो शालेय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी आमदार संजना जाधव यांनी उपस्थित राहून खेळाडूंना आणि सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य, ऊर्जा आणि संघभावना अशा स्पर्धांमुळे अधिक दृढ होणार असल्याचे त्या म्हणाल्या.