हिंगोलीच्या महावितरण कार्यालयावर आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दोन वाजता दरम्यान जिल्ह्यातील बाह्य स्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज मोर्चा काढला आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे .त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे पूर्ण वेतन दिले जात नसल्याचा आरोप या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलाय. यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.