दोन दिवसांपूर्वी सर्पदंश झाल्याने उपचारांदरम्यान प्रौढाचा जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नरेंद्र शंकर आंबेकर (48, रा.तोरसकरवाडी गोळप) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी ते गोळप येथील आनंदा बापट यांच्याकडे गडगा घालण्याचे काम करायला पायवाटेने चालत जात होते. ते कुंभारवाडी धारेजवळ बापट यांच्या घराजवळ आले असता त्यांच्या उजव्या पायाला खोटेच्यावर नाग जातीचा साप चावला