सट्टा पट्टीचे आकडे घेऊन पैशाच्या हार जितची बाजी लावीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना रंगेहात पकडल्याची घटना घडली. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पवनी येथे घडली. या घटनेत पवनी पोलिसांनी हिरामण सीताराम तेलमासरे (50) रा हनुमान मंदिर परिसर बजरंग वार्ड पवनी व सुधीर वासुदेव खोब्रागडे (45) रा पवनी यांचे विरोधात पवनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.