आज दि. २७ ऑगस्ट रोजी कन्नड शहरासह तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून विविध मंडळांनी आकर्षक सजावट, रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल उभारली आहे. सांयकाळी ७ वाजेपासून भक्तिगीतांच्या सुरांनी वातावरण दुमदुमले असून गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी गल्लीबोळ दणाणून गेले आहेत. तसेच माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या घरी बप्पाचे आगमन झाले असून त्यांनी विधीवत आरती केली.