बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून तब्बल ७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. २६ सप्टेंबर २०२३ रोजी नाना सुरुशे यांच्या घरातून दागिने चोरीस गेले होते.पोलीस उपनिरीक्षक कुंजिर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून सर्व दागिने (बांगड्या, अंगठ्या) जप्त करण्यात आल्याची माहिती बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी २९ रोजी दुपारी १२ च्या सुमारास दिली आहे.