राहुरी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी स्वाभिमानीला राम-राम ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मंगळवारी राञी ठाणे येथील आनंद आश्रमात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे यांची शेतकरी सेना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांच्याकडे शेतकरी सेनेची जबाबदारी दिली आहे.