धरणगाव तालुक्यातील नांदेड आणि निमगव्हाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वाढलेल्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. नुकतेच बिबट्याने दोन म्हशींच्या पारड्यांना ठार मारले असून, आता तो सोमवारी ८ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता तापी नदीकाठी असलेल्या धुनीवाले दादाजी दरबाराच्या आवारातून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.