सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा वाहिली आदरांजली.११ सप्टेंबर रोजी आलापल्ली येथे राष्ट्रीय वन शहीद दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नक्षलवादी हल्ले आणि वन्य प्राण्यांशी संघर्ष करताना आपले प्राण गमावलेल्या हुतात्मा वन कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी आलापल्लीच्या वन विभागाच्या कार्यालया समोर असलेल्या शहीद स्मारकावर विविध मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून शहिदांना नमन केले.