इस्लामिक कॅलेंडरनुसार मोहरमला नवीन वर्षाची सुरुवात होते. १० जुलै रोजी शहरात 'यौम-ए-आशूरा साजरा करण्यात येतो. त्या निमित्त शहरात १३९ सावर्यांचा मजमा बुधवारी सिटी चौक येथे दुपारी २ वाजता भरला होता. त्याचप्रमाणे शियापथीय बांधवांकडून मातमी जुलूसचे आयोजन करण्यात आले आहे. सुन्नी बांधव अत्यंत आदरपूर्वक शियापंथीय बांधवांच्या जुलूसला सन्मानाने वाट मोकळी करून दिली जाते. सिया लोकांनी मोहम्मद पैगंबर याचे नातू उमाम हुसेन यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर प्राचीन काळापासून केला जातोय.