भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे अॅक्टिव्हावरून जात असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभांगी सुनील यादव ३३, असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, सध्या त्या गणेशपूर टेकडी वस्ती, बुट्टीबोरी येथे राहत होत्या. शुभांगी सकाळी १० वाजता त्यांच्या अॅक्टिव्हाने वर्धा रोडवरून डोंगरगाव येथील तेजस्विनी झुनका भाकर केंद्रासमोरून जात होत्या.