बेलतरोडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनीष नगर येथील हॉटेल ब्रिंदावन ओयो येथे सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून आरोपींकडून रोख रक्कम 18 हजार दोन मोबाईल दोन चार चाकी वाहने दोन दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण 30 लाख 85 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी मॅथ्यू फिलोपोस, विजय नारदेलवार, नितीन राठोड, चैतन्य आवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.