कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावरून मोटरसायकल वरून पुराच्या पाण्यात पडून वाहून जात असताना कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी आई व मुलाला वाचवण्यात यश आले.विजय आप्पासो माळी (वय २८) शोभा आप्पासो माळी (वय ५०) राहणार खंडेराजूरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली अशी दोघांची नावे आहेत. तर नदीत पडून वाहून जात असताना शोभा माळी या गंभीर जखमी झालेल्या असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय माळी हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमा