विरार येथील विजय नगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. इमारतीच्या ढिगाराखाली अडकून पडलेल्या 11 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. डिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आलेल्या 11 जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.