बिअर शॉपीची परवानगी मिळवण्यासाठी दारव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून व खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केली. ही घटना दारव्हा शहरात उघडकीस आली. हा प्रकार २० मार्च रोजी घडला होता.तब्बल सहा महिन्यानंतर दि.११ सप्टेंबरला दारव्हा पोलिसांनी आरोपी रामदास नामदेवराव चिरडे रा. मुंगसाजी मंदिराजवळ,दारव्हा याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.