श्री गणपती गौरी सणानिमित्त फलटण शहर व तालुक्यातील महिलांनी शेतकरी राजा पारंपरिक व धार्मिक आणि सामाजिक संस्कृती जप्त माझी लेक व सद्यस्थितीत देशात घडणाऱ्या घटनेवर चिंता व्यक्त करीत लाडक्या बहिणीला न्याय द्यावा यासारखे देखावे सादर केल्याने या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरी पूजनादिवशी आज बुधवार दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून महिलांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते.गौरी पूजनादिवशीl महिलांनी एकमेकींच्या घरी जावून गौरीला हळदी कुंकू लावले.