सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांना घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, माध्यमिक शिक्षक इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला. सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत.