चामोर्शी :क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ प्राप्त डॉ. पंकज नरुले यांचा आज दिनांक २५ सप्टेंबर गुरुवारला शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, चामोर्शी यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला.डॉ. पंकज नरुले हे पहिल्या पिढीतील आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजवर १०० हून अधिक विद्यार्