कन्हैयानगर परिसरात वनविभागाची धडक कारवाई : लोखंडी पोल चोरी करणारा गजाआड आज दिनांक 30 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील कन्हैयानगर परिसरात वनविभागाच्या राखीव वनक्षेत्र क्र. 271A मध्ये लावण्यात आलेल्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कुंपणातील 35 लोखंडी पोल अज्ञाताने चोरीस नेले होते. या प्रकरणी वनविभागाने गुप्तहेरांच्या मदतीने केवळ 24 तासांत तपासाची दिशा बदलत आरोपीला ताब्यात घेतले. धडक कारवाईत पोल चोरी करणारा सोहेल इसाक शेख (वय 25, रा. जालना) या