आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे दिनांक 27 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा आरक्षणासंदर्भात व ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेण्यासंदर्भात आंदोलनाला निघणार आहे, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही बैठक आज घेण्यात आली आहे, याप्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित झाले होते.