दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात आलेल्या पुरामुळे गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घराच्या छतावर अडकलेल्या चंद्रकांत ठेंगे व खंडू कोकरे यांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने थरारक रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप बाहेर काढले. या बचाव मोहिमेत परवेज मुलाणी, गुलचंद पुतुरे, समीर मकानदार आणि अर्जुन परसे या रेस्क्यू टीमच्या जवानांनी धाडसी कामगिरी करत दोघांचे प्राण वाचवले. नागरिकांनी या बचाव पथकाचे कौतुक केले आहे.