आज बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास आमदार निरंजन डावखरे यांनी मंत्रालयात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करून "अनंत चतुर्दशी " निमित्त कोकण विभागातील सर्व महाविद्यालयांना एकदिवसीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. कोकण विभागात "अनंत चतुर्दशी " हा सण केवळ श्रद्धेचा नाही, तर भावनेचा आणि परंपरेचा उत्सव मानला जातो. गणेशोत्सव काळात विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण कोकणात प्रचंड गर्दी, सार्वजनिक वाहतुकीवरील ताण आणि पोलीस यंत्रणेवर वाढलेले ओझे दिसून येते.