गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 29 ऑगस्टला दुपारी 3 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत चोरी करणाऱ्या मुख्य चोरट्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली आहे