अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मौजे जेऊर येथे शनिवारी दुपारी 3 वाजता अतिवृष्टीची पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार मगर, गट विकास अधिकारी कवितके, मंडळ अधिकारी भासगी, ग्राम महसूल अधिकारी चव्हाण, कृषी सहायक बगले, ग्राम विकास अधिकारी अजनाळकर, पोलीस पाटील रहिमान अत्तार, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, मन्सूर अत्तार यांच्यासह रोजगार सेवक अजित म्हेत्रे आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.