माजलगाव तहसील कार्यालयासमोर गुरुवार दि.4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता, ओबीसी समाजाने आंदोलन करुन, हैदराबाद गॅझेटविरोधात तीव्र निषेध नोंदविला. राज्य शासनाने काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या वेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच गॅझेटची होळी करून संताप व्यक्त करण्यात आला. ओबीसी समाजाचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक हक्क अबाधित ठेवावेत, अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.