प्रवाशांची वाढती संख्या, रेल्वे मार्गावरील गुन्हेगारी आणि सुरक्षा व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त अंतर्गत कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते नवीन रेल्वे पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक लोहमार्ग श्री प्रशांत बुरडे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. मुंबई येथील त्यांच्या कार्यालयातून हा सोहळा संपन्न झाला.