शिरूर कासार तालुक्यातील शृंगारवाडी येथे शुक्रवार दि.12 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता झालेल्या सभेत ओबीसी आरक्षणाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, एका स्टॅम्प पेपरवरून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे हा अन्याय आहे आणि हा अन्याय ओबीसी समाज कधीही खपवून घेणार नाही.हाके यांनी मनोज जरांगे यांच्या सभेची तुलना करताना सांगितले की, त्यांच्या सभेला आमदार-खासदार गाड्या पुरवतात; पण