शहरातील टीबीटोली परिसरातील दीपक यादोराव पारधी (३८) यांची फसवणूक त्यांच्या परिचयातील लोकांनी केल्याचा ऑगस्ट महिन्यातील प्रकार उघडकीस आला आहे.नितीन नगरधने (३८, रा. गोंदिया) याने व्यावसायिक व्यवहाराचे कारण सांगून पारधी यांचे आधार व पॅनकार्डच्या प्रती घेतल्या. त्यावरून बँक ऑफ इंडिया रेलटोली शाखेत पारधी यांच्या नावाने खाते उघडले. खाते उघडल्यानंतर पासबुक, चेकबुक, एटीएम कार्ड व खाते संलग्न सिमकार्ड नितीनने स्वतःकडे ठेवून ते पुढे अभय कटरे (३०, रा