नगर-मनमाड महामार्गावर रस्त्यावर अनेकांचे बळी जात असून या रस्त्याचे काम तातडीने व्हावे या मागणीसाठी नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने काल बुधवारी राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. माञ या आंदोलनातील ९ आंदोलकांवर राहुरी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.