हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची एसटी प्रवर्ग म्हणून नोंद असून,बंजारा समाज हैद्राबाद गॅझेट प्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे,महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करावा अशी मागणी जोर धरू लागलीय,उदगीर व जळकोट तालुक्यातील बंजारा बांधवांची बैठक पार पडली, या बैठकीत येत्या १६ सप्टेंबर रोजी उदगीर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांनी दिली आहे.