चंद्रपूर सर्वत्र जोरदार पाऊस आल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहेत अशातच वडोली येथील अंधारी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नदीच्या काठावर अज्ञात इसमाचा मृत्यू वहात येऊन आढळल्याची घटना 3 सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी एक वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. नदीकाठी मृतदेह आढळल्याने गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली घटनेची माहिती पोलीस पाटील मंदा आत्राम यांनी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना दिली.