काळवीटाची शिकार करुन मांस विक्री करण्यात येत असल्याची माहिती बुलढाणा वनविभागाला मिळताच त्यांनी शेळगाव आटोळ ते अंचरवाडी शिवारात धाव घेतली.यावेळी काळवीटाचे मास विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच शिकारी शेजारील मका पिकात फरार झाले.ही कारवाई आज 24 ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली.घटनास्थळावरुन 1 कापलेला व 1 जिवंत काळवीट,1 मोटरसायकल 4 चामडे व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.