जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत पुढीलप्रमाणे विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. नगर परिषद तिरोडा येथे गावठाण सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करणे, बँक मित्र संघटनेच्या प्रलंबित मागण्यांचे निराकरण करणे,नोनीटोला (ग्रा.पं. सोनी, ता. गोरेगाव) येथील शेती अभिलेख दुरुस्तीचे काम तत्परतेने करणे.