आज दिनांक एक सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आझाद मैदान येथे दाखल झाले आहेत आझाद मैदान येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत मनोज जारंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी शशिकांत शिंदे दाखल झाले यावेळी त्यांच्या समवेत आमदार संदीप क्षीरसागर सह अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.