चामोर्शी तालूक्यातील कान्होली येथे विज अंगावर पडत एका ३० वर्षीय शेतकर्याचा मृत्यु तर एक गंभीर जखमी चामोर्शी :- आज दि.११ सप्टेबंर गूरूवार रोजी सांयकाळी ४.३० वाजताचा सूमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले अन् विजेचा गडगडाट होत पावसाला सूरवात झाली दरम्यान तालूक्यातील कान्होली येथील शेतकरी सूरज देशमुख वय ३० शेतात काम करीत असताना विज अंगावर पडल्याने उपचारा दरम्यान सांयकाळी ५.४५ वाजता त्याचा मृत्यू झाला तर यावेळी दीपक शेंडे नामक एक अन्य शेतकरी सूद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.