काही महिन्यापूर्वी रत्नागिरी शहरा नजीकच्या मिरजोळे गावातील प्रत्येक घरातून जुने व्यवस्थित सुरू असलेले वीज मीटर कोणत्याही पूर्व सूचना किंवा नोटीस न देता बदलण्यात आले. त्यानंतर वाढीव बिलांची चौकशी करून ती कमी करण्याची आणि जुने मिटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील संतप्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी ,सदस्य वर्ग येथील महावितरण कार्यालयावर धडकले.