मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी, सातारा जिल्ह्यातून अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत, आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता, साताऱ्यातील पोवई नाका शिवतीर्थावरून, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून, मराठा बांधव मुंबईला रवाना झाले असून, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी, जिल्हाधिकारी कार्यासमोर दोन महिने आमरण उपोषण करणारे, तात्या सावंत हेही मुंबईला रवान झाले.