पत्रकार असल्याचे भासवून बातमी न लावण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याचा व पैसे न दिल्याचा राग आल्याने दमबाजी व शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अर्जुन भाऊसाहेब गुरूळे यांच्या फिर्यादीवरून नवनाथ पांडुरंग वाघ यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पैश्याची मागणी केल्याची तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.याबाबत आज २ सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी माहिती दिली आहे.